Menu Home

‘बर्ड फ्लूच्या नोंदी पोल्ट्री पक्ष्यांमध्ये नाहीत’

केरळ राज्यात बदके; हिमाचल प्रदेशात स्थलांतरीत पक्षी तर मध्यप्रदेशात कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची बाधा झाल्याची अधिकृत नोंद आहे. पोल्ट्री फार्म्समधील पक्ष्यांशी वरील बर्ड फ्लू संसर्गाचा संबंध नसल्याचे शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

ICAR - National Institute of High Security Animal Diseases

बर्ड फ्लूसंदर्भात भोपाळस्थित ‘राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था’  चाचणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करते. मध्यप्रदेश व राजस्थानात H5N8 टाईप विषाणूची बाधा झाल्याने कावळे मृत झाल्याचा अहवाल वरील संस्थेने दिला आहे. तथापि, कावळे वगळता अन्य पक्ष्यांमध्ये उपरोक्त विषाणूची बाधा नाही, असे मध्यप्रदेश राज्य पशूपालन खात्याचे उपसंचालक प्रमोद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

“संबंधित विषाणू पोल्ट्री फार्म्समध्ये मिळून आलेला नाही.” असे मध्यप्रदेश पशूपालन खात्याचे संचालक डॉ. आर.के. रोकडे यांनी स्पष्ट केलेय. “राजस्थानात कावळ्यांच्या ‘डेथ पॅटर्न’नुसार असे दिसतेय, की ‘कोल्ड शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा,” असे मत राजस्थान विद्यापीठाच्या व्हेटरनरी सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. ए.के. कटारिया यांनी मांडले.

पोल्ट्री पक्ष्यांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने केले जाते. आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार उच्च पोषणाचे खाद्य दिले जाते. व्हेटरनरी डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रोगराईवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून, सध्याच्या बर्ड फ्लूचा संबंध सोशल मीडियासह मुख्य प्रवाहातील माध्यमांनी पोल्ट्री उद्योगाशी जोडू नये, असे आवाहन पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. पी. जी. पेडगावकर यांनी केले आहे. (समाप्त).

Categories: Uncategorized

agriculturist

1 reply

  1. Those are spreading fake news in bird flue and causing huge losses to Poultry industry and GOVT of India shall be sent them to jail.
    Before broadcasting if they would have been confirmed with GOVT Labs , would have saved crores of rupees. Inhuman act by irresponsible mass media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *