Menu Home

सोया डीओसी आयातीला मंजुरी द्यावी:’एआयपीबीए’

सोया डीओसीच्या वाढत्या किंमतीमुळे अंडी व ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 12 लाख टन सोया डीओसीच्या ड्युटी फ्री (करमुक्त) आयातीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने (एआयपीबीए) केली आहे.

ता. 2 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एआयपीबीए’ने पत्र लिहिले आहे. पत्राचा आशय असा : साठेबाजीमुळे सोयाबीन, सोया डीओसीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली दिसते. कोरोना व लॉकडाऊनमुळे पोल्ट्री उद्योगाचे नुकसान झाले आहे. 25 टक्के पोल्ट्री फार्मर्सनी व्यवसाय बंद केला आहे. म्हणून पोल्ट्री मिलर्सना करमुक्त डीओसी आयातीची परवानगी मिळावी. शिवाय, वायदेबाजारात सट्टेबाजी रोखण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. ‘एआयपीबीए’चे चेअरमन बहादूर अली यांनी हे निवेदन जारी केले आहे. केंद्रीय पशूपालन, अर्थ आणि वाणिज्य मंत्र्यांनही निवदेन पाठवण्यात आलेय.

स्त्रोत – एआयपीबीए

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *