Menu Home

पोल्ट्री : कोरोनाकाळातील बदलाच्या नोंदी

पोल्ट्री : कोरोनाकालातील बदलाच्या नोंदी

 1. यापुढील काळात शहरी भागात ऑनलाईन चिकन, अंडी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत जाणार आहे.
 2. चिल्ड चिकन खाण्यासाठी अधिक रूचकर आणि सॉफ्ट लागते. त्यामुळेही ग्राहकांकडून मागणी वाढतेय.
 3. चिकन दुकानांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ऑनलाईन पद्धतीने घरपोच विक्री परवडणारी आहे.
 4. हायजीन आणि क्वालिटी याबाबत ग्राहक अधिक दक्ष झाले आहेत. ऑनलाईन विक्रीत या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागणार.
 5. वेळ वाचणे, क्वालिटी + हायजेनिक प्रोसेसमुळे डिलिव्हरी चार्जेस द्यायला ग्राहक तयार आहेत.
  पुण्यातील पोल्ट्री उद्योजक राजूदादा भोसले यांची ही निरीक्षणे आहेत.
  योजना पोल्ट्रीचे संचालक राजूदादा भोसले गेली चाळीस वर्ष पोल्ट्री व्यवसायात कार्यरत आहे. नगर रोड येरवड्यात शाह दावल बाबा दर्गानजिक योजना पोल्ट्रीचे जुने दुकान परिसरात फेमस आहे. पुण्यात सर्वांत वाजवी दरात क्वालिटी अंडी व चिकन मिळण्याचे ठिकाण. अंडी, ब्रॉयलर्स उत्पादन आणि थेट विक्री क्षेत्रात योजना पोल्ट्री कंपनी एक मोठे नाव आहे. चौकातल्याच ग्लोबल स्वेअर टॉवरमध्ये वर्षाभरापूर्वी योजना पोल्ट्रीचे ऑफिस शिफ्ट झालेय.
  कोरोना संकटानंतर योजना पोल्ट्रीच्या कामकाजातही बदल झालेत. ‘कोरोना संकटाने योजना पोल्ट्रीलाही ऑनलाईन अंडी – चिकन विक्रीकडे वळायला भाग पाडले. आम्ही योजना पोल्ट्री अॅपद्वारे ठराविक विभागात ऑनलाईन विक्री सुरू केली. सध्या ठराविक विभागात योजना पोल्ट्री अॅपद्वारे योजना चिल्ड चिकन, योजना पॉवर एग्जची ऑनलाईन विक्री सुरू केलीय.
  योजना पोल्ट्री फर्ममधील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी गौरव आणि त्याची टीम ऑनलाईनचे काम पाहते.

देशी बॅकयार्ड पोल्ट्री ते मॉर्डन कमर्शिअल पोल्ट्री – असा चाळीस वर्षांचा अनुभव, या काळातील चढ-उतार, तेजीमंदी असे सर्व टप्पे राजूदादांनी पार केले आहेत. पोल्ट्रीतील जून्या नव्या माणसांचे भक्कम नेटवर्क, प्रत्येक नवा बदल शक्य तेवढ्या लवकर आत्मसात करण्याची तयारी या बळावर योजना पोल्ट्रीचा वाढ-विस्तार कायम राहिला आहे. पोल्ट्री किंवा बिझनेससाठी लागणारे औपचारिक शिक्षण राजूदादांनी घेतले नसले तरी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना राजूदादांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.

“कोरोना, बर्ड फ्लूने मोठे हादरे दिले. संकटे येतात – जातात. टिकून राहणे महत्त्वाचे . जगाच्या (उद्योगजगत) बाबतीत जे घडेल, ते आपल्याला चुकणार नाही. म्हणून जास्त ताण न घेता, आहे त्या कंडिशनमधून टप्प्याटप्प्याने बाहेर कसे पडता येईल, याचे नियोजन महत्त्वाचे,” असे राजूदादा सांगतात. – दीपक चव्हाण, ता. 3 मार्च 2021.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *