Menu Home

शेतकरी कंपन्यांद्वारे पोल्ट्री उद्योगाला थेट मका पुरवठा

‘करमाड’ व ‘गोदा’ फार्म्सचा संयुक्त उपक्रम शिवराई येथे वजन-काट्यासह ‘ड्राईंग यार्ड’चे उद्घाटन वैजापूर, जि. औरंगाबाद : शासकीय धान्य खरेदीच्या यशस्वी उपक्रमानंतर शेतकरी कंपन्यांनी खासगी उद्योगांसाठीही थेट शेतमाल खरेदी सुरू केली आहे. शिवराई (ता. वैजापूर) येथे शेतकऱ्यांकडून मका खरेदी आणि पोल्ट्रीसह प्रक्रिया उद्योगाला थेट पुरवठा उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले. करमाड फार्मर […]

‘अमेरिकन चिकन लेग्जवरील आयात कर कमी करू नका

भारतीय पोल्ट्री फार्मर्सच्या हितार्थ ऑनलाईन पिटीशन, तुमचाही पाठिंबा हवाय : ‘केपीएफबीए’चे आवाहन कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनने ( केपीएफबी) उपरोक्त विषयासंदर्भात Change.org या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पिटीशन जारी केली असून, शेती क्षेत्रातील सजग कार्यकर्ते व मान्यवरांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आपणही ही पिटीशन साईन करून पाठिंबा देऊ शकता. […]

देशात 85 कोटी पोल्ट्री बर्ड्स

बोलके आकडे: राष्ट्रीय पशूपक्षी गणना 2019 पोल्ट्री बर्ड्स : कोंबड्या, बदके, ईमू, टर्की, बटेर यांचा पोल्ट्री बर्ड्समध्ये समावेश. 85.1 कोटी : देशातील पोल्ट्री बर्ड्सची संख्या 17 टक्के : 2012 च्या तुलनेत 2019 मधील पोल्ट्री बर्ड्सच्या संख्येतील वाढ 46 टक्के : देशी (गावठी) पक्ष्यांच्या संख्येतील वाढ 4.5 टक्के : कमर्शियल पक्ष्यांच्या […]

वाढत्या वयानुसार वाढते प्रथिनांची गरज!

मातेच्या दूधानंतर सर्वाधिक पोषक आहार म्हणजे अंडी होय. एका अंड्यात सहा ते सात ग्रॅम प्रोटिन्स असतात…आज जागतिक अंडी दिनानिमित्त प्रथिनांच्या आहारातील आवश्यकतेविषयक महत्त्वाच्या नोंदी जरूर वाचा… वयाची 50 पार केलेल्यांना शरिराची झीज भरुन काढण्यासाठी दिवसाच्या तिन्ही जेवणांमध्ये प्रथिनयुक्त आहार उपयुक्त ठरतो, असे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये नुकत्याच प्रसिद्ध […]

एक इंजिनिअर पोल्ट्रीत उतरतो तेव्हा…

कमी खर्च, थेट विक्री = मंदीवर मात करकंब, ता. पंढरपूर : येथे योगेश बोराडे यांचे पाच हजार पक्षी क्षमतेचे दोन लेअर पोल्ट्री युनिट्स आहेत. गेल्या वर्षी दीड हजार क्षमतेचे कमी खर्चातले एक युनिट्स उभे केले. ते यशस्वी झाल्यानंतर, त्यातून आत्मविश्वास आल्यानंतर नवे साडेतीन हजाराचे युनिट उभारले आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट […]

मक्यावर लष्करी अळी : पोल्ट्रीसह व अन्नसुरक्षेचा प्रश्न

“आजघडीला कांद्याप्रमाणेच सुमारे सव्वा दोन कोटी टन इतकी मक्याची वार्षिक गरज आहे. कोंबड्यांना दररोज मक्यापासून तयार केलेले खाद्य लागते. कांद्याप्रमाणेच ही दैनंदिन खपाची कमोडिटी आहे.” मक्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा संबंध थेट देशाच्या अन्न सुरक्षेशी आहे. एक कोंबडी साधारपणे सव्वा तीन किलो खाद्य खावून दोन किलो वजन देते. या खाद्यात दोन […]

ब्रॉयलर्स मार्केट : ओपन फार्मर्ससाठी तज्ज्ञांचा सल्ला

“सध्या पिल्लांचे दर 21 रुपये आहेत. या पार्श्वभूमीवर, ओपन फार्मर्सनी 1.5 ते 1.6 प्रतिकिलोच्या आसपास ‘एफसीआर’ राखल्यास नफा मिळण्याची शक्यता अधिक राहते.” “महाराष्ट्रात रविवारसाठी 75 प्रतिकिलो लिफ्टिंग म्हणजेच उत्पादन खर्चाच्या आसपास ब्रॉयलर्सचे रेट्स सुधारले असले तरी या रिकव्हरीतील सातत्याबाबत साशंकता आहे,” कोमरला फीड्सचे संचालक श्री. कृष्णचरण यांनी म्हटले आहे. ते […]

कुजके, किडके धान्य ‘पोल्ट्री’साठी विषच

अॅफ्लाटॉक्सिन’ विषयक ‘एफएसएसएआय’च्या नव्या गाईडलाईन्स काय आहेत… ‘अॅफ्लाटॉक्सिन’ काय आहे, कसे रोखाल, वाचा सोप्या भाषेत… अॅफ्लाटॉक्सिन काय आहे? : अॅफ्लाटॉक्सिन Aflatoxin ज्याच्या नावातच विष (toxin) आहे. अॅस्पर्गीलस फ्लव्हस Aspergillus flavus नामक विषारी बुरशीपासून निर्मित होते. तिच्या अद्याक्षरावरून (A + fla) अॅफ्लाटॉक्सिन नामकरण आहे. अॅस्पर्गीलस फ्लव्हस खासकरून सडक्या धान्यावर वाढते. असे […]

कडकनाथ पक्षी : वस्तूस्थिती आणि विपर्यास

देशी पक्ष्यांचे बिझनेस मॉडेल : शास्त्रीय मिमांसा आणि जनजागृती गरज लेअर (अंडी) पोल्ट्रीमध्ये सध्याच्या बोलीभाषेत कमर्शियल (इंग्लिश) आणि देशी (गावठी) असे दोन प्रकार होत. राज्यात इंग्लिश अंड्यांची मार्केटिंग व्यवस्था प्रस्थापित, विकसित आहे. त्यात लिक्विडीटी आहे, म्हणजे दोन-अडीच कोटीं अंड्यांची रोज विक्री होते. तसे गावठीचे नाही. आठवडे बाजार, लोकल ट्रेडर हे […]