Menu Home

कुजके, किडके धान्य ‘पोल्ट्री’साठी विषच

अॅफ्लाटॉक्सिन’ विषयक ‘एफएसएसएआय’च्या नव्या गाईडलाईन्स काय आहेत… ‘अॅफ्लाटॉक्सिन’ काय आहे, कसे रोखाल, वाचा सोप्या भाषेत…

अॅफ्लाटॉक्सिन काय आहे? : अॅफ्लाटॉक्सिन Aflatoxin ज्याच्या नावातच विष (toxin) आहे. अॅस्पर्गीलस फ्लव्हस Aspergillus flavus नामक विषारी बुरशीपासून निर्मित होते. तिच्या अद्याक्षरावरून (A + fla) अॅफ्लाटॉक्सिन नामकरण आहे. अॅस्पर्गीलस फ्लव्हस खासकरून सडक्या धान्यावर वाढते. असे धान्य जर मानवी व पशुआहारात आले तर भयंकर रोगविकृती वाढतात. पोल्ट्रीधारक शेतकरी किंवा फीड कंपन्या खराब, काळे दाणे असलेला मका का खरेदी करत नाही, हे यावरून कळते.

अॅफ्लाटॉक्सिन मानवी आहारात येऊ नये, किंवा झुंडीने वसाहत करणाऱ्या अॅस्पर्गीलस फ्लव्हस बुरशीचा प्रादुर्भाव वाढ नये, यासाठी भारत सरकारचे फूड सेफ्टी अॅन्ड स्टॅंडर्ड अॅथॉरीटीने (FSSAI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. शेतकऱ्यांसह, संबंधित मानवी व पशुपक्षी खाद्य उत्पादकांसाठी आवश्यक असलेली तत्वे पुढीलप्रमाणे – 1. पिकाच्या कापणी मळणीपूर्वी काय काळजी घ्यावी – 1 पिक उत्पादन प्रक्रियेत कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या चांगल्या पीक पद्धतींचा अवलंब करावा. 2 जैविक किडींच्या माध्यमातून अॅफ्ला या बुरशीला प्रभावीपणे रोखले जाते. विषयुक्त बुरशींऐवजी बिनविषारी उपजातींद्वारे नियंत्रणाची पद्धत अधिक प्रभावी आहे. 3. पीक काढणीनंतर – पिकाचे हार्वेस्टिंग केल्यानंतर तातडीने त्याला ऊन दाखवा आणि सुकवा. त्यातील ओल (आर्द्रता) कमी होईल. 4 ओलावा मोजणाऱ्या मीटरद्वारे (moisture metere) आपल्या धान्याची तपासणी करा. 5. खराब झालेले, सुरकतलेले, किडके, बुरसटलेले धान्य चाळणी लावून बाजूला काढा. 6. मॅट किंवा पॅलेट्सवर पोत्यांची थप्पी (stack) लावा. भिंतीपासून दूर ठेवा. 7. अॅफ्लाटॉक्सिन हे फूड आणि फीडमध्ये जाणार नाही, यासाठी देखभाल व्यवस्था निर्माण करा. 8. खूप जास्ती प्रदुषित धान्ये संपूर्णपणे नष्ट करा. – दीपक चव्हाण, पुुणे. ता. 10 सप्टेंबर 2019 Photocredit – Wikipedia

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *