Menu Home

मुलांच्या पहिल्या आहारासाठीही अंड्यांची शिफारस

अमेरिकेच्या आहारविषयक मार्गदर्शक सल्ला समितीने अंड्याची शिफारस आईच्या दूधाशिवायचे पहिले अन्न म्हणून केली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार २४ महिने आणि त्यापेक्षा लहान मुलांसाठी आणि गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी अंडी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे. अर्भक आणि नुकतेच चालू लागलेली लहान मुले यांच्यासाठी प्रथमच अंड्याची शिफारस पहिले अन्न म्हणून केली गेली आहे.

photo credit : pexels site

शास्त्रीय अहवालानुसार, अंड्यातील पोषकता विशेषतः कोलीन या घटकांचे महत्त्व अधोरेखित करतानाच, लहान मुलामध्ये अंडेविषयक अॅलर्जी कमी करण्यासाठी मुलांच्या पहिल्या आहारांमध्ये अंड्यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. सल्ला समितीने किशोर पूर्व आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी अंड्याचा आहारात समावेश करण्यासाठी खास प्रोत्साहन दिले आहे.

अंडी हे कोलीनच्या  सर्वांत चांगल्या स्रोतांपैकी एक असून, मेंदूच्या सुरुवातीच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक आहे. सर्व अमेरिकन लोकांच्या आहारामध्ये त्याचा वापर अत्यंत कमी असल्याचे सल्ला समितीने नमूद केले आहे. अगदी ९२ टक्के गर्भवती महिलांच्या आहारातून दैनंदिन गरजेइतकेही कोलीन जात नाही.
आहारविषयक मार्गदर्शक सल्ला समितीने विशेषत्वाने लहान मुलांमध्ये अंड्यांच्या वापराची आग्रह धरला आहे. एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ४ ते ६ महिने वयाच्या मुलांमध्ये अन्नांविषयी अॅलर्जी होण्यापासून रोखण्यासाठी अंडे उपयुक्त ठरू शकते. त्यांच्या विकासासाठीही फायदा होऊ शकतो.

अमेरिकन अंडे बोर्डने यावर भाष्य करताना आपल्या अहवालामध्ये अंड्यातील पोषकतेविषयी माहिती दिली.
अंड्यातून आरोग्यदायी आयुष्याच्या पायाभरणीसाठी आवश्यक ती आठ महत्त्वाचे पोषक घटक उपलब्ध होतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरणारा आहे. त्यातून प्रथिने, कोलीन, रिबोफ्लॅविन (बी२ जीवनसत्त्व), बी१२ जीवनसत्त्व, बायोटीन (बी७) पॅन्टोथेनिक आम्ल (बी५), आयोडीन आणि सेलेनियम हे पोषक घटक मिळतात. या घटकांमुळे स्नायू, हाडे आणि मेंदूच्या विकासासोबतच अन्य आरोग्यविषयक फायदे होते.
अमेरिकन सल्ला समितीने अमेरिकन व्यक्तींमध्ये असलेली ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्यातील ड जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. तसेच त्यातील कोलेस्टेरॉल हे पोषकतेच्या दृष्टीने फारसे हानिकारक ठरत नसल्याचेही नमूद केले आहे.

अंडी आणि कोलेस्टेरॉल या विषयावर भाष्य करताना शास्त्र हे तुलनेने स्थिर आहे. बहुतांश शास्त्रीय पुराव्यानुसार, अंड्याचा आहारातील वापर हा ह्रदयरोगांशी जोडला जात नाही. उलट हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासानुसार, ३० वर्षापेक्षा अधिक काळातील माहितीचे विश्लेषण केले असता अंडी खाणे हे ह्रदयरोगाशी जोडता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकन ह्रदय संघटनेच्या वतीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या मते, अंडी हा ह्रदयासाठी आरोग्यदायी आहाराचा भाग आहे. उलट आरोग्यदायी आहाराचा पाया म्हणून अंड्यांचा विचार केला पाहिजे.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *