Menu Home

मांसल कोंबड्यांच्या कार्यक्षमतेमध्ये किण्वनयुक्त गहू कोंड्यामुळे वाढ

किण्वन प्रक्रिया केलेल्या गहू कोंड्याचा वापर मांसल (ब्रॉयलर) कोंबड्याच्या आहारामध्ये पुरक खाद्य म्हणून केल्यास त्यांच्या
पचनससंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. त्याच प्रमाणे आतड्याचा दाह कमी होण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष तैवान येथील अभ्यासातून पुढे आला आहे.

Photo credit – Unsplash

गहू प्रक्रिया उद्योगामध्ये उपपदार्थ म्हणून शिल्लक राहणाऱ्या कोंड्याचे प्रमाण जागतिक पातळीवर प्रती वर्ष ६५ लाख टनापेक्षाही
अधिक आहे. गहू कोंड्यामध्ये लिग्नोसेल्युलोज घटकांचे प्रमाण अधिक (४४ टक्के) असून, ऊर्जा मूल्य कमी (अंदाजे १३००
किलोकॅलरी प्रती किलो) असते. यामुळे कोंडा एक आतडे असलेल्या सजीवांसाठी अयोग्य मानला जातो. त्याच प्रमाणे कोंड्यातील
स्टार्चशिवायची पॉलीसॅकराईड घटक हे पोषकतारहित व पचननीयतेसाठी कठीण असतात. त्यामुळे पचनसंस्थेतील हानीकारक
घटकांची वाढ वेगाने होऊन दाह वाढतो.
कमी किमतीच्या कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगातील घन टाकाऊ घटकांवर विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या साह्याने किण्वनाची
प्रक्रिया केल्यास त्याचे पोषकता मूल्य वाढते. साध्या किण्वनाच्या तुलनेमध्ये घनस्थितीतील किण्वनाची प्रक्रिया ही अधिक कार्यक्षम
आहे. विविध जैवकार्यक्षम संयुगांच्या निर्मितीसाठी ती अधिक परवडणारीही आहे.

किण्वन प्रक्रिया केलेल्या गहू कोंडायुक्त आहाराचा मांसल कोंबड्यातील अभ्यास
एकूण ४०० रॉस ३०८ मांसल नर कोंबड्यांचे पाच गट करण्यात आले. त्यातील नियंत्रित गटाला मका आणि सोयाबीनचे खाद्य देण्यात
आले. अन्य चार गटांना नियंत्रित आहारासोबत ५ टक्के गहू कोंडा, १० टक्के गहू कोंडा, ५ टक्के किण्वन केलेला गहू कोंडा, १० टक्के
किण्वन केलेला गहू कोंडा देण्यात आला.
त्यातील ५ टक्के किण्वन केलेला गहू कोंडा दिले गेलेल्या कोंड्यामध्ये २२ ते ३५ दिवसांदरम्यान लक्षणीयरित्या अधिक वजन वाढ
मिळाली. या पक्ष्यांतील अन्नाच्या रुपांतराचे गुणोत्तर (P < 0.05) एकूण प्रयोगाच्या कालावधीत आणि शेवटच्या फिनिशर
टप्प्यामध्ये चांगला असल्याचे दिसून आले. या गटातील पक्ष्यांच्या लहान आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये (शेषांत्र) कोलीफॉर्मची
संख्या लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले.
या अभ्यासाचे निष्कर्ष सायन्स डायरेक्ट मध्ये सविस्तर प्रकाशित करण्यात आले आहेत. (अनुवादित. पोल्ट्री वर्ल्ड डॉट कॉम) खासगी वितरणासाठी कंटेट प्रसारण – ता. 5 ऑगस्ट 2020.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *