Menu Home

पोल्ट्री खताद्वारे पर्यावरण संवर्धन!

पोल्ट्री खतातून> बायोगॅस + वीज + एनपीके = पर्यावरण संवर्धन…एका यशस्वी प्रयोगाची नोंद

Image may contain: 1 person, outdoor

खुटबाव, जि. पुणे : पोल्ट्री खतावर चालणाऱ्या बायोगॅस प्रकल्पातून निघणारी स्लरी ही पाईपद्वारे थेट पिकापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयोगास यश आलेय. मोटार बसवलेल्या टॅंकरमधून तीनशे फूट नळीद्वारे स्लरी पुरवठ्याची ही सिस्टिम साकारलीय खुटबाव ( जि. पुणे ) येथील पोल्ट्री उद्योजक राजेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून!

श्री. थोरात सर चेअरमन असलेली ओम चिक्स ( इंडिया) प्रा. ली. ही कंपनी महाराष्ट्रातील आघाडीची पोल्ट्री इंटिग्रेटर कंपनी असून, पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. कुठल्याही पोल्ट्री कंपनीच्या ब्रीडर्स फार्ममधून निघणाऱ्या खताचे व्यवस्थापन कसे करावे हा जटील प्रश्न असतो. त्यावर प्रभावी उपाय म्हणून 840 घनमीटर बायोगॅस उत्पादन क्षमतेचा पोल्ट्री खत आधारित बायोगॅस प्रकल्प यशस्वीरित्या खुटबाव येथे उभारण्यात आलाय. या बायोगॅसद्वारे जनरेटर्स चलित वीजनिर्मिती क्षमता 100 KW इतकी आहे. पोल्ट्री खतापासून गॅस काढल्यानंतर दैनंदिन कमाल 25 हजार लिटर स्लरी मिळण्याची स्थापित क्षमता आहे. *ब्रीडर्स फार्मद्वारे हॅचिंग एग्ज हे प्रमुख उत्पादन तर पोल्ट्री खतापासून गॅस आणि स्लरी ही आणखी दोन उप उत्पादने* या माध्यमातून मिळत आहेत.

श्री. थोरात सांगतात, “पोल्ट्री खतातून गॅस काढल्यानंतर स्लरी मिळते. स्लरीमधून गॅस काढण्याच्या प्रक्रियेत मिथेन व कॉर्बन डायऑक्साईड निघून जातात. परिणामी स्लरीतील अव्वल दर्जाच्या एनपीकेचा आमच्या ऊस शेतीला पुरवठा करता येतोय. मोटारद्वारे टॅंकरमधून स्लरीचा उपसा होतो. अर्ध्या तासात एक एकर ऊसाला स्लरी फिरवता येते.”

“मी स्वत: शेतकरी असल्यामुळे पोल्ट्री खताचे महत्त्व जाणून आहे. दुसरीकडे, माशांच्या उपद्रवामुळे कमी वेळेत पोल्ट्री खताची विल्हेवाट आणि विक्री हे प्रमुख आव्हान असते. आजघडीला देशभरात ही समस्या आहे. तथापि, ही समस्या डोकेदुखी न ठरता त्यातून संधी वा संपत्तीनिर्माण करता येईल, असे उदिष्ट वरील प्रयोगातून साधण्यात यश आले आहे. “

– दीपक चव्हाण, पुणे. ता. 18 एप्रिल 2019

Categories: Uncategorized

agriculturist

0 replies

  1. I Congratulate Mr Throat to find out an all in one solution for disposal of poultry waste and appreciate the initiative which he has taken in the poultry waste management drive.I am sure that the all in solution which he has introduced will give us Biogas ,Electricity,Organic food and not only create waste management awareness amongst the people but also will enrich our farmers leading to development of our nation.l thank him for his contribution in waste management drive

  2. I Congratulate Mr Throat to find out an all in one solution for disposal of poultry waste and appreciate the initiative which he has taken in the poultry waste management drive.I am sure that the all in solution which he has introduced will give us Biogas ,Electricity,Organic food and not only create waste management awareness amongst the people but also will enrich our farmers leading to development of our nation.l thank him for his contribution in waste management drive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *