Menu Home

पोल्ट्री-पशुखाद्यास लॉकडाऊनमधून वगळण्याचे निर्देश

पुणे, ता. 23 : पोल्ट्री व पशुखाद्य उद्योगाशी संबंधित वस्तूंना लॉकडाऊनमधून वगळण्याचे निर्देश केंद्रीय पशुपालन विभागाचे संयुक्त सचिव डॉ. ओ.पी. चौधरी यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या जीवनाश्यक वस्तूंच्या नोटीसा राज्य सरकारांनी जारी केल्या आहेत. त्यात अनेक राज्यांनी एका दिवसाची कोंबड्यांची पिल्ले, अंडी, मटण आदींचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही. शिवाय, संबंधित राज्यांकडून मका आणि सोयामिलच्या वाहतूकीलाही परवानगी दिलेली नाही. मका व सोयामिल पशू-पक्ष्यांसाठीचे प्राथमिक खाद्य आहे. वरील वस्तूंचा पुरवठा रोखला तर पशू-पक्षी उपासमारीने मरतील. म्हणून, मका, सोयामिलसह जिवंत पिल्ले, अंडी, मटण, पशुखाद्य आदींचा समावेश लॉकडाऊनमधून वगळलेल्या वस्तूंत करावा, असे पत्रात नमूद आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चिकन व अंड्यांची दुकाने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट केली आहेत. पोलिसांकडून राज्यांत काही ठिकाणी चिकनची दुकाने बंद करण्यात आली होती. म्हणून, सर्व जिल्ह्यांत चिकनची दुकाने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट असल्याचे स्पष्ट निर्देश सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांकडून मिळावेत, अशी मागणी पोल्ट्री उद्योगाकडून केली जात आहे.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *