Menu Home

वाढत्या वयानुसार वाढते प्रथिनांची गरज!

मातेच्या दूधानंतर सर्वाधिक पोषक आहार म्हणजे अंडी होय. एका अंड्यात सहा ते सात ग्रॅम प्रोटिन्स असतात…आज जागतिक अंडी दिनानिमित्त प्रथिनांच्या आहारातील आवश्यकतेविषयक महत्त्वाच्या नोंदी जरूर वाचा…

वयाची 50 पार केलेल्यांना शरिराची झीज भरुन काढण्यासाठी दिवसाच्या तिन्ही जेवणांमध्ये प्रथिनयुक्त आहार उपयुक्त ठरतो, असे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखाद्वारे समोर आलेय. कॅनडातील मॅकग्रील युनिव्हर्सिटीतील अभ्यास गटाने हे संशोधन केले आहे. तीन वर्ष चाललेल्या संशोधनात 67 ते 84 वयाच्या 1700 स्त्री-पुरूषांचा समावेश होता. ‘ स्नायूंची ताकद व प्रथिनांचे सेवन’ यावर संशोधनाचा भर होता.

प्रमुख निष्कर्ष :
दिवसाकाठी केवळ एका जेवणात प्रथिनयुक्त आहार घेणाऱ्यांमध्ये दिसली पुढील लक्षणे…

 • वाढत्या वयानुसार वाढती अकार्यक्षमता
 • चक्कर येवून पडणे
 • मानसिक दुर्बलता
 • वयानुसार वाढते परावलंबन
  तिन्ही वेळच्या जेवणात प्रथिनयुक्त आहाराचे परिणाम
 • ठणठणीत प्रकृती
 • उत्साही व चापल्यपूर्ण जीवनशैली

विसरु नये असे काही

 • प्रौढ व्यक्तिंनी किमान 1.2 ग्रॅम प्रथिने प्रतिकिलो शारीर वजनानुसार घेणे आवश्यक

प्रमुख निरीक्षणे :

 • प्रथिनांमुळे स्नायूंची दुर्बलता रोखता येते, चापल्य कायम राखता येते.
 • दिवसाच्या तिन्ही जेवणांमध्ये हवीत प्रथिने
 • प्रथिनांचे सेवन वृद्धत्वातही लाभकारक

हे माहिती हवे

 • वाढत्या वयात स्नायूंमधील प्रथिनांची झीज भरुन निघण्याचे प्रमाण कमी होते.
 • अमेरिकी कृषी खात्याच्या पोषणविषयक गाईडलाईन्सनुसार वयाची 50 पार केलेल्यांनी दैनंदिन 140 ते 196 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक

शब्दांकन – दीपक चव्हाण, पुणे.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *