Menu Home

आयुर्वेदिक कोंबडी : वस्तूस्थिती काय?

अमेरिकेतील ओहोयो प्रांतातील एका मॉलमधील फोटो आहे. फोटो क्रेडीट – श्री. संजय नळगीरकर

खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आयुर्वेदिक कोंबडी व अंडी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून, यासंबंधी संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, सोशल मिडियासह मेनस्ट्रीम मिडियात सुरू झालेल्या चर्चेच्यानिमित्ताने लेख…

पोल्ट्री सायन्सनुसार आयुर्वेदिक कोंबडी वा अंडी असे काही नसते.
मात्र, जगात ऑरगॅनिक, अॅंटिबायोटिक फ्री, नॉन जीएमओ अशी लेबलची चिकन व अंडी मिळताहेत. ग्राहकांच्या रेट्यामुळे विकसित देशांत अशाप्रकारच्या उत्पादनाचा ट्रेंड विकसित होतोय.
1. ऑरगॅनिक लेबलाचे चिकन व अंडी ही अर्थातच देशी ब्रीड आणि देशी गावरान खाद्य खाणाऱ्या कोंबडीपासून मिळू शकतात.
2. अॅंटिबायोटिक फ्री : इंडस्ट्रियल वा कमर्शियल पोल्ट्री उत्पादन प्रक्रियेत अॅंटिबायोटिक न वापरता वाढवलेल्या कोंबडीला अॅंटिबायोटिक फ्री असे म्हटले जाते.
किंवा अॅंटिबायोटिक मात्रा मानवी प्रतिकार शक्तीला अपाय होणार नाही या प्रमाणात ठेवून झालेल्या उत्पादनाला ‘अॅटीबायोटिक रेसीड्यू फ्री’ असे म्हणता येईल.
3. नॉन जीएमओ : अमेरिका, युरोपातील मका जीएमओ ( जणुकीय स्थानांतरीत) तर भारतातील मका, सोयाबीन नॉन जीएमओ प्रकारातील आहे. फ्रान्स, जपानसारख्या विकसित देशातील काही पोल्ट्री फीड कंपन्या भारत किंवा युक्रेनकडून नॉन जीएमओ मका, सोया आयात करतात. असा नॉन जीएमओ मका, सोयामिल खाऊ घालून उत्पादित केलेल्या चिकन, अंडीच्या पाकिटावर नॉन जीएमओ असे लेबल असते.
ग्राहकांची आवडनिवड, आहारशैली यानुसार असे ट्रेंड स्थापित होतात. ग्राहकांच्या आवडीनिवडीला कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही.

खासदार संजय राऊत यांचा मुद्दा बरोबर होता, पण संदर्भ चुकले.

खरा प्रश्न पुढे आहे,
सुमारे 23 कोटी अंडी व 2 कोटी किलो चिकन ही देशाची दैनंदिन गरज आहे. 
मका हा कोंबड्यांचा मुख्य आहार आहे. पोल्ट्री उत्पादनातील 80 टक्के खर्च मका व सोयावर होतो. 
या वर्षीही देशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय. महाराष्ट्रासह देशातील प्रमुख उत्पादक राज्यांत मक्याचे पीक संकटात आलेय. परिणामी बाजारभाव आजवरच्या उच्चांकी 2300 ते 2500 रु. प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. वर्षभरात मक्याचे भाव दुपटीवर पोचलेत.
पोल्ट्रीला पुढे कच्चा माल मिळाला नाही, तर अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे.
कारण, मकाच उपलब्ध झाला नाही, तर कोंबड्या कशा जगवणार.
मक्याचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च वाढलाय. आज ब्रॉयलर्सचा प्रतिकिलो उत्पादन खर्च 80 रु. आहे, तर फार्म लिफ्टिंग बाजारभाव 60 रु. प्रतिकिलो आहे. अंड्याचा प्रतिकिलो उत्पादन खर्च 4 रु. पर्यंत पोचला असून, गेल्या काही महिन्यातील सरासरी फार्म लिफ्टिंग बाजारभाव तीन रुपयाच्या आसपास आहे.
पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. पुढे गरीबांच्या ताटातून अंडाकरी, आमलेट गायब होईल काय, इतपत परिस्थिती खराब झाली आहे. प्रोटिन सिक्युरिटीचा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात मक्यावर लष्करी अळीचा सर्वांत मोठा प्रार्दुभाव असून, निम्मे पिके वाया गेल्यात जमा आहे. 
राऊत साहेबांसह महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत वरील प्रश्न जरूर उपस्थित करावा.
– दीपक चव्हाण, पुणे

ता. 17 जुलै 2019

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *