Menu Home

ब्रॉयलर्स मार्केट : ओपन फार्मर्ससाठी तज्ज्ञांचा सल्ला

“सध्या पिल्लांचे दर 21 रुपये आहेत. या पार्श्वभूमीवर, ओपन फार्मर्सनी 1.5 ते 1.6 प्रतिकिलोच्या आसपास ‘एफसीआर’ राखल्यास नफा मिळण्याची शक्यता अधिक राहते.”

Image result for broiler

“महाराष्ट्रात रविवारसाठी 75 प्रतिकिलो लिफ्टिंग म्हणजेच उत्पादन खर्चाच्या आसपास ब्रॉयलर्सचे रेट्स सुधारले असले तरी या रिकव्हरीतील सातत्याबाबत साशंकता आहे,” कोमरला फीड्सचे संचालक श्री. कृष्णचरण यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, “अनुकूल हवामानामुळे पक्ष्यांची वेगाने वाढणारी वजने, पितृपक्ष पंधरवडा व नवरात्रीमुळे घटता खप यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक राहण्याची धास्ती आहे.”

ब्रॉयलर्स मार्केट : बोलके आकडे

75 रू. प्रतिकिलो
चालू तिमाहीतील सरासरी उत्पादन खर्च

59 रू. प्रतिकिलो
14 सप्टेंबरपर्यंतचा सरासरी लिफ्टिंग रेट

48 रू. प्रतिकिलो
ऑगस्ट महिन्यातील सरासरी लिफ्टिंग रेट

45 दिवस
महाराष्ट्रातील विक्रीयोग्य पक्ष्यांचे सध्याचे सरासरी वय

2.7 किलो
महाराष्ट्रातील विक्रीयोग्य पक्ष्यांचे सध्याचे सरासरी वजन

माहिती स्त्रोत : कोमरला फीड्स, सांगली. महाराष्ट्र

wording by Deepak Chavan, Pune. Date 15 Sep 2019

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *