Menu Home

प्लास्टिक अंडी : वस्तूस्थिती आणि गैरसमज

Image result for eggs

मागील काही दिवसांपासून तथाकथित प्लास्टिक अंडीबाबत काही माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खासकरुन महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सोशल मिडियांत यासंबंधी विपर्यस्त, अशास्त्रीय आशयाच्या पोष्ट फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेमकी वस्तूस्थिती समोर आली पाहिजे. त्याने ग्राहकांचा संभ्रम दूर होईल. 1. चीनमध्ये शंभर टक्के तपकिरी कवचाच्या अंडयांचे उत्पादन होते, तर भारतीय अंडयांचे कवच हे सफेद असते. चीनमधून तस्करी करुन भारतात अंडी आयात करणे हे आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. शिवाय, नैसर्गिक अंडयांच्या तुलनेत कृत्रिम अंडी तयार करणे हे अतिशय खर्चिक ठरु शकते. भारतात अंडयांची विपूल उपलब्धता असून, सध्या शेतकरी उत्पादन खर्चाच्या आसपास किमतीला अंडी विकत असताना प्लास्टिक अंडी निर्माण करण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही.
2. यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच उच्चांकी तापमानवाढ होती. आपल्याकडे रोजच्या गरजेसाठी खपणारी अंडी शितगृहात न ठेवता ती थेट बाजारात आणली जातात. वाहतूक प्रक्रियेत रेफ्रिजरेटेड कंटेनर्स वापरली जात नाहीत. अशा परिस्थितीत अंडयातील पिवळा भाग ( योक ) थोडा कडक होतो. त्याचे कारण उष्म्यामुळे बाष्पीभवन होवून, अंडयाच्या आतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो. कमी आर्द्रतेमुळे अंडयांचा पांढरा भाग देखिल शिजवल्यानंतर काहीसा रबरासारखा होवू शकतो. मात्र, तापमान सामान्य असते तेव्हा मात्र असे प्रकार घडत नाही. या प्रक्रियेत अंडयांच्या पोषणमुल्यात त्यामुळे काहाही बदल होत नाही. पुर्वीसारखेच त्यातील पोषकता सुरक्षित असते.
3. ज्या वेळेला अंडयांना कमी मागणी असते, तेव्हा शितगृहांमध्ये दहा सेल्सिअस तापमानाला साठवली जातात. सापेक्ष आर्द्रता 75 ते 80 टक्के राखली जाते. साधारपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात कमी मागणीमुळे अंडी शितगृहात साठवली जातात, पुढे थंडी वाढल्यानंतर ती बाजारात येतात. 
4. अंडयातील आर्द्रता कमी झाल्यानंतर त्यातील पोषणमुल्यात कसलाही बदल होत नाही. कुणीही व्यक्ती प्रयोगशाळेत जावून अंडयातील प्रथिने आणि अन्य पोषक घटकांची चाचणी करु शकते. दुसरे महत्त्वाचे उन्हाळ्यात अंडी खावू नये हा देखिल गैरसमज आहे. या उलट, वाढत्या उष्म्यामुळे माणसाच्या उर्जेची पातळी खालावते. अशावेळी शरिराची झीज टाळण्यासाठी अंडयांची गरज असते. त्यामुळे नियमितपणे अंडी खाल्ली पाहिजेत.
5. जगातील सर्वांत सुरक्षित आणि पोषणमुल्ययुक्त अंडी भारतात उत्पादित होतात. अमेरिकेसह सर्व विकसित देशांत जीएमओ ( जनुकीय बदल केलेले ) मका आणि सोयामिल हे पोल्ट्री खाद्यात वापरली जातात. भारतातील मका आणि सोयामिल हे नॉन जीएमओ प्रकारातील आहेत.  जगभरात भारतीय अंडी ही नॉन जीएमओ खादय वापरुन उत्पादित प्रकारात मोडतात. त्या आधारावर निर्यातीसाठीही विशेष मागणी असते.
6. आतापर्यंत विविध राज्यांत तथाकथित व संशयित प्लास्टिक अंडयांची चाचणी प्रयोगशाळांध्ये झाली असून, त्यात ही अंडी कोंबडीपासून निर्मित – जैविक अंडी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय अंडी खाण्यास अत्यंत सुरक्षित आहे. अंडी उदयोगावर लाखो शेतकरी थेट अवलंबून असून, चुकीच्या माहितीमुळे त्यांच्या रोजगारवर गदा येवू शकते. शिवाय, ग्राहक चांगल्या पोषणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सोशल मिडियाद्वारे अशी माहिती पसरवाताना खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *