Menu Home

पशुखाद्यासाठी लवकरच ‘बीआएस स्टॅंडर्स’

Image result for bis standards

चारा आणि पशुखाद्यामध्ये विविध भेसळीसोबतच किडनाशके आणि जड धातूंचे प्रमाण आढळत आहे. हीच प्रदुषके पुढे प्राणीज अन्नपदार्थांमध्ये येत आहेत. पशुखाद्यातील भेसळ रोखण्यासाठी पशुखाद्यासाठीही योग्य ती मानके आणण्याचे नियोजन भारतीय अन्न संस्था आणि मानक प्राधिकरण ( FSSAI) करत आहे. हे नियम आणि मानके अंतिम होईपर्यंत संस्थेने सर्व पशुखाद्य घटकांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चे निकष पाळणे गरजेचे असल्याच्या सूचना केल्या आहेत.

भारतीय अन्न संस्था आणि मानक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार, पशुखाद्यातील भेसळ आणि  प्रदूषक घटकांच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी व्यावसायिक पशुखाद्य आणि पशुखाद्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे घटकासाठी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) चे निकष पूर्ण करणे गरजेचे असेल. पशुखाद्य किंवा तत्संबंधी घटकाची निर्मिती, आयात, वितरण किंवा विक्री ही भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणीकरणाखेरीज करता येणार नाही. या विषयातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला असून, जून पासून या सूचना कठोरपणे अंमलात आणण्यात येतील. 

प्राणीज अन्नामध्ये प्रदूषकांचे प्रमाण आढळण्यामागील मुख्य स्रोत पशुखाद्य आणि चारा हाच असून, त्यांच्या दर्जा, सुरक्षेचे  काटेकोरपणे नियंत्रण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय दूध आणि दर्जा सर्वेक्षण, २०१८ च्या अहवालानुसार, अफ्लाटॉक्सिन एम १ सारख्या प्रदुषक घटकांचे अंश केवळ असंघटित क्षेत्रातील कच्च्या दुधामध्येच आढळतात असे नव्हे, तर संघटितपणे कार्यरत असलेल्या प्रक्रियायुक्त दुधांमध्येही आढळून येतात. त्यामागे पशुखाद्य आणि चारा हेच आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या मते, प्रक्रियायुक्त दुधामध्ये अफ्लाटॉक्सिन एम१ चे अंश निर्धारीत पातळीपेक्षा अधिक आढळणे, ही गंभीर बाब आहे.

एफएसएसएआय च्या मते, सुरक्षित आणि दर्जेदार दूध आणि दूध उत्पादनासाठी खाद्याद्वारे प्राण्यामध्ये येणाऱ्या प्रदूषक घटकांना कायद्याद्वारे आणलेल्या नियंत्रक मूल्ये किंवा शिफारशीद्वारे रोखता येईल. त्याचा फायदा प्राणीज उत्पादनामध्ये आढळणारे मायकोटॉक्सिनचे अंश रोखण्यासाठी होऊ शकतो. मात्र, पशुपालन व्यवस्थापन पद्धतींमध्ये योग्य त्या सुधारणा आणण्यासाठीही या नव्या निकषांचा फायदा होऊ शकेल. त्यासाठी संस्थेने पशुपालन, डेअरी आणि मस्त्यपालन मंत्रालय आणि राष्ट्रीय डेअरी सुधारणा बोर्ड यांच्या सहकार्याने लहान पशुपालकांमध्ये जागरुकता आणण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. 

(माहिती स्त्रोत हिंदू बिझनेस लाईन)

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *