Menu Home

‘चिकनविषयी अफवेविरोधात शासनाद्वारे तातडीने गुन्हा’

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची माहिती
‘राज्यात पोल्ट्री नियंत्रक मंडळाची स्थापना होणार’

पुणे, ता. 16 : सोशल मीडियात ‘चिकनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव’ अशी खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात पशुसंवर्धन खाते गुन्हा दाखल करणार असून, यासंदर्भात येत्या आठ दिवसांत आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

सोशल मीडियातील विपर्यस्त प्रचारामुळे पोल्ट्री उद्योगात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत श्री. केदार यांनी नागपूरात रविवारी (ता.16) पोल्ट्री उद्योग शिष्टमंडळ आणि शेतकऱ्यासमवेत बैठक घेतली.

सोशल मीडियातील विपर्यस्त प्रचारामुळे पोल्ट्री उद्योगात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत श्री. केदार यांनी नागपूरात रविवारी (ता.16) पोल्ट्री उद्योग शिष्टमंडळ आणि शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. गेल्या आठवड्यांत व्हॉट्सअप व फेसबुकवर चिकनबाबत ग्राहकांत गैरसमज निर्माण होतील अशा पोस्ट्स जाणीवपूर्वक पसवरण्यात आल्या आहेत. “याबाबत पशुसंवर्धन खाते तातडीने सायबर क्राईम विभागाकडे संबंधित अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करेल,” असे श्री. केदार यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर, व्यंकटेश्वरा हॅचरिजचे सरव्यवस्थापक डॉ. पी. जी. पेडगावकर, डॉ. शंकर मोधे, विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दूधबडे, सचिव डॉ. गजानन वानखेडे, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुकुंद कदम, डॉ. सुरेंद्र राऊत यांच्यासह महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स अॅन्ड वेल्फेअर असोसिएशन (पीएफबीए) आणि विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य शेतकरी उपस्थित होते.

पोल्ट्री नियंत्रक मंडळाची स्थापना होणार:
“राज्य सरकार लवकरच पोल्ट्री उद्योगाशी संबंधित विविध विषयांबाबत ‘नियंत्रक मंडळ’ (Poultry Regulatory Body) स्थापन करेल. या मंडळात शास्त्रज्ञांसह पोल्ट्रीधारक शेतकरी, शासकीय अधिकारी, पोल्ट्री संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल,” असे श्री. केदार यांनी स्पष्ट केले. तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांतील पोल्ट्री उद्योगाच्या विकासामागील घटकांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर उद्योगवाढीचे मॉडेल राज्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे श्री. केदार यांनी सांगितले.

  • दीपक चव्हाण, ता. 16 फेब्रुवारी 2020

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *