Menu Home

चिकनमध्ये कोरोना ही अफवा : डॉ. रानडे

डॉ. अजित रानडे
  • समाज माध्यमांतील ‘ते’ व्हिडिओ राणीखेत आजाराचे

पुणे, ता. 4 : गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर कोरोना या विषाणूचा ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून,
शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर
रानडे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या
अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले.

“सध्या समाज माध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू
आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद भारतात नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे
तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत, ” असे डॉ. रानडे यांनी सांगितले.

“भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे 100 डिग्री तापमानाशिवाय उकळले
जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात
जगत नाहीत. शिवाय,
भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या
विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत,” असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.

“ग्राहकांनी व्हॉट्सअप वा फेसबुक आदी माध्यमांतील विपर्यास केलेल्या पोस्ट्सवर विश्वास ठेवू नये. भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहे.
अनेकदा कुक्कुटपालन व्यवसायासंबधीच्या आकसातून वा गैरसमजातून ठराविक मंडळींकडून अशा प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल केल्या जातात. त्या प्रमाण
मानू नयेत, ” असे आवाहनही त्यांनी केले.

…समाप्त…

Categories: Uncategorized

agriculturist

22 replies

  1. Super we the farmer had a grate tenson of corona from chiken rate are almost low because of this news farmer were in loss just because of this news

  2. मग कशा मुळे होतो कोरोना
    जर एखाद्याला याची लागण झाली तर तात कालीन उपाय काय?

  3. रानडे सर प्लास्टिक अंडी याविषयी सुद्धा योग्य मार्गदर्शन करावे… आणि खरोखरच अंडी उकडताना किंवा इतर प्रकार उदा. भुरजी,ऑम्लेट, किंवा अंडाकरी बनवताना पुर्वीसारखा वास का येत नाही. शिवाय अंडी व्यवस्थित उकडली ही जात नाही… स्पष्टीकरण द्यावे हि विनंती…🙏 8108776975.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *