Menu Home

कृत्रिम अंडी हा अपप्रचार – ‘एफएसएसएआय’

प्लॅस्टिक अंड्याविषयी ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन – लेखांक – 1

गेल्या काही महिन्यामध्ये अंड्याच्या दर्जा आणि सुरक्षेसंबंधी ग्राहक आणि विक्रेत्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. ग्राहकांकडूनही खोट्या किंवा प्लॅस्टिकच्या अंड्याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. खरे पाहता प्लॅस्टिक किंवा कृत्रिम अंडे हा एक भ्रम आहे, कारण अशा प्रकारे नैसर्गिक अंड्यासारखेच दिसणारे कृत्रिम अंडे बनवण्याचे कोणतेही तंत्रज्ञान सध्यातरी उपलब्ध नाही.

अंड्याचा दर्जा आणि सुरक्षा
ग्राहकांच्या मनामध्ये अंड्याचा दर्जा आणि दिसण्याविषयी प्रतिमा ही प्रामुख्याने त्यांच्या साठवणीच्या पद्धतीवर आणि किती काळ साठवलेले आहे, यावर तयार होत असते. थंड तापमानामध्ये विशेषतः रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या अंड्याचा दर्जा हा चांगला राहतो. ही अंडी दोन ते तीन दिवसांमध्ये वापरली पाहिजेत. जेव्हा अंडी ही सामान्य तापमानाला ठेवली जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक बदल घडून येत असतात. उदा. गंध, पोत आणि एकंदरित दिसणे.

या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे आपण खोट्या किंवा प्लॅस्टिक अंड्याविषयीचा भ्रम तोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मार्गदर्शक पुस्तिकेचा उपयोग पोल्ट्री संबंधित व्यावसायिकांसोबतच ग्राहकांनाही होणार आहे. कारण यातून ग्राहकांना ताजी अंडी पुरवण्यासह त्यांचा दर्जा व सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे
-ग्राहकांनी हे जाणून घेतले पाहिजे की कृत्रिम अंडी बनवण्याचे कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नाही.
-अंड्याच्या साठवणीच्या कालावधीवर अंड्याच्या साठवणीच्या पद्धतीचा मोठा परिणाम होतो. सामान्य तापमानामध्ये अंड्याचा दर्जा एक दिवसामध्ये कमी होऊ शकतो, तर रेफ्रिजरेटरमध्ये ४ ते ५ दिवस अंडी राहू शकतात.
-अंडी घातल्यानंतर सामान्य तापमानामध्ये सुमारे १० ते १२ दिवस ताजी राहू शकतात. मात्र, साठवणीच्या तापमानामध्ये वाढ झाल्यास त्यांची साठवणक्षमता कमी होते.
-ग्राहकांनी शक्यतो रेफ्रिजरेटरमध्ये व खास तयार केलेल्या ट्रेमध्ये अंडी साठवावीत.

  • बहुतांश घटनांमध्ये स्वच्छ आणि कोणतेही दृष्य तडे किंवा परिणाम न दिसणारी अंडी थंड तापमानामध्ये साठवल्यास अंडी घातल्यानंतर ४ ते ५ आठवड्यांपर्यंत चांगली राहू शकतात.
    -विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी अंडी योग्य आणि विश्वासार्ह स्रोताकडूनच मिळवावीत. ही अंडी रेफ्रिजरेटरमध्ये साठवावीत.
    -अस्वच्छ, तडे गेलेली अंडी वापरू नयेत. अशा कवचाला तडे गेलेल्या अंड्यामध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो. अस्वच्छ अंड्यामध्ये प्रदूषित घटकांचा समावेश होऊ शकतो.
    -शीतगृहामध्ये अंडी साठवत असताना योग्य तापमान आणि सापेक्ष आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही गडबड झाल्यास अंड्याचा बलक आणि अन्य भाग (योल्क आणि अल्बूमीन) एकत्र होण्याची शक्यता असते.
    -ग्राहकांनी या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून अगदी घरातही साध्या चाचण्यांद्वारे अंड्याचा ताजेपणा आणि दर्जा तपासणे सहज शक्य होईल. (क्रमश:)

(प्लॅस्टिक अंड्याविषयी भ्रामक कथांना दूर करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) जारी केलेल्या इंग्रजी पुस्तिकेचा मराठीत भाषांतर केले आहे.)

Categories: Uncategorized

agriculturist

1 reply

Leave a Reply to Shreekant Tanksali Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *