Menu Home

एक इंजिनिअर पोल्ट्रीत उतरतो तेव्हा…

कमी खर्च, थेट विक्री = मंदीवर मात
करकंब, ता. पंढरपूर : येथे योगेश बोराडे यांचे पाच हजार पक्षी क्षमतेचे दोन लेअर पोल्ट्री युनिट्स आहेत. गेल्या वर्षी दीड हजार क्षमतेचे कमी खर्चातले एक युनिट्स उभे केले. ते यशस्वी झाल्यानंतर, त्यातून आत्मविश्वास आल्यानंतर नवे साडेतीन हजाराचे युनिट उभारले आहे.
फेब्रुवारी ते ऑगस्ट या सात महिन्यांत एका अंड्याचा उत्पादन खर्च 4 रुपये तर फार्म गेट लिफ्टिंग रेट 3 रुपये अशी स्थिती होती. तथापि, योगेश यांनी स्वत: विक्री केल्यामुळे त्यांचा किरकोळ विक्रीचा सरासरी दर चार रुपयांवर आला आणि मंदीच्या आवर्तनातून धंदा सूरक्षित राखला. आजघडीला बाजार उत्पादन खर्चाच्यावर आहे, पुढे हिवाळा आणि सुणासुदीमुळे खपात वाढ होईन नफ्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे…
साडेतीन हजाराच्या विस्तारीत बॅचचे उत्पादन दिवाळीपासून सुरू होईल. पुढे, बाजारभाव किफायती राहण्याचे चिन्हे आहेत. शिवाय, मक्याच्या वाढत्या उपलब्धतेमुळे आताचा उत्पादन खर्चही कमी होईल. म्हणजे दुहेरी फायदा. मंदीत शेडचे काम सुरू केले आणि उत्पादन तेजी सुरू झाल्यावर येतेय. एकूणच योग्य टायमिंग साधले आहे.
योगेश सांगतात, “लेअर फार्ममधील संपूर्ण अंड्यांचे थेट मार्केटिंग केले जाते. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर मागणीत मोठी वाढ झालीय. पंढरपूर शहरात अंडी-चिकनच्या दुकांनात थेट विक्री केली जाते.”
भांडवल उभारणी : लोकमंगल बॅंकेतून 20 लाखाचे कर्ज काढले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ मिळालाय. कर्ज हप्ते सुरळीत आहेत. हप्ता भरल्यानंतर महामंडळाकडून तत्काळ व्याजाची रक्कम जमा होते. महामंडळाकडील अर्जफाट्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. कुणा एजंटची मदत घेण्याची गरज पडली नाही.
इनोव्हेशन – पंधरा आठवड्याच्या पुलेट्स पक्ष्यासह जून्या प्रोजेक्ट्सचा प्रतिपक्षी उभारणी खर्च होता 400 रूपये. 70 बाय 20 असा 1400 चौरस फुटाचा पत्र्याचा शेड उभारला. पक्षांची विष्ठा पडण्यासाठी त्यात दोन उभे चर मारून खड्डे केले. शेड बांधकामाचा खर्च आला एक लाख 25 हजार रुपये. दोन टायरच्या केजेससाठीचा खर्च होता प्रतिपक्षी 105 रुपये. अशापद्धतीने शेड व पिंजऱ्यांसाठी तीन लाख रुपये तर दोनशे रुपये प्रति पुलेट्स पक्षी या प्रमाणे तीन लाख रुपये प्रमाणे एकूण सुमारे 6 लाखात दीड हजार पक्षी क्षमतेचे लेयर युनिट्स उभे राहिले. प्रतिपक्षी खर्च सुमारे चारशे रुपये येईल. जिथे सुमारे सातशे रुपये प्रतिपक्षी खर्च येतो, तो 300 रु. ने कमी करून एक किफायती मॉडेल विकसित केले आहे. चर पद्धतीमुळे यामुळे माशांचाही त्रास नाही, आणि वासही येत नाही. इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा पोल्ट्रीत अशापद्धतीने उपयोग झाला.
“नव्या साडे तीन हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सची प्रतिपक्षी कॉस्ट मात्र सातशे रुपये प्रतिपक्षीनुसार सुमारे 25 लाखात जाईल. जूने युनिट्स हे केवळ उपजिवकेपुरते आणि शिकण्यासाठी उभारले होते. नव्या युनिट्समध्ये पक्षी क्षमता जास्त असल्याने त्याची उभारणी पोल्ट्रीतील ठरलेल्या स्टॅन्डर्डप्रमाणे केली आहे.”
“भाऊ वैभव बोराडे, वडील अरूण बोराडे, आई अलका बोराडे यांनी प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला. खरे तर मोठे भाऊ औद्योगिक प्लास्टिकनिर्मितीचे काम करतात. त्यांनी पोल्ट्री सुरू करण्याची दिशा दाखवली. संपूर्ण कुटुंबाच्या सहभागी असल्यामुळे पोल्ट्रीतील करिअरच्या प्रारंभाला चांगली दिशा मिळाली,” असे योगेश सांगतो.
योगेश बोराडे,
9890744144
करकंब, जि. सोलापूर.

कमर्शिअल पोल्ट्री एक आर्ट आहे. एक एंटरप्राइज वर्क आहे. उद्यमशील, संवादपटू, कष्टाळू आणि आशावादी लोकच पोल्ट्रीत यशस्वी होतात.
आज, इथे एका सामान्य घरातल्या नव्याने पोल्ट्रीत उतरलेल्या तरूणाची छोटी स्टोरी पोस्ट केलीय, ज्याने पुढील सर्व निकष पूर्ण करून दमदार सुरवात केली आहे.

  1. आधी कमी खर्चात छोटे युनिट उभारा
  2. स्थानिक पातळीवरच अंडी जिरवा, जवळपास नवे मार्केट शोधा
  3. तुम्ही प्रभाव टाकू शकाल अशी बॅंक शोधा
  4. छोट्या युनिट्समधून शिकल्यानंतर पुढे विस्तारित युनिट हाती घ्या
  5. घरचा पाठिंबा मिळवा.
  6. सरकारी सबसिडी, प्रोत्साहनाची माहिती काढून लाभ घ्या
  7. आपल्या असोसिएट लोकांचे नेटवर्क उभे करा, संपर्कात रहा
  8. अडचणींचे गाऱ्हाणे मांडू नका, उपाय सांगा, मदत मिळवा
  • दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे.

Categories: Uncategorized

agriculturist

0 replies

  1. Please translate above article in English. Because many people will get benefits to start like this. This is my humble request.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *