Menu Home

‘अमेरिकन चिकन लेग्जवरील आयात कर कमी करू नका

भारतीय पोल्ट्री फार्मर्सच्या हितार्थ ऑनलाईन पिटीशन, तुमचाही पाठिंबा हवाय : ‘केपीएफबीए’चे आवाहन

कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनने ( केपीएफबी) उपरोक्त विषयासंदर्भात
Change.org या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पिटीशन जारी केली असून, शेती क्षेत्रातील सजग कार्यकर्ते व मान्यवरांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आपणही ही पिटीशन साईन करून पाठिंबा देऊ शकता. त्यासाठीची लिंक – https://tinyurl.com/yyq7u777

संबंधित ऑनलाईन पिटीशनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले आहे. पिटीशनचा आशय पुढीलप्रमाणे – भारतातील काही वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार भारत सरकार अमेरिकी चिकन लेग्जवरील आयातकर 100 टक्क्यावरून 30 टक्क्यापर्यंत कमी करणार असल्याचे कळते. असे झाल्यास अमेरिकन फ्रोजन चिकनची आयात मोठ्याप्रमाणावर वाढेल आणि देशी पोल्ट्री उद्योगावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. यामुळे भारतीय पोल्ट्री क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते.

चिकन लेग्जची आयात म्हणजे अप्रत्यक्षरित्या मका, सोयामिलची देखिल आयात होईल. कारण, चिकनसाठी पशुखाद्य म्हणून उपरोक्त खाद्याचा वापर होतो. भारतीय मका, सोयाबीन उत्पादकांचेही यामुळे नुकसान होवू शकते. शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीच्या आपल्या उदिष्टाशी हे विसंगत ठरेल.

म्हणून, आम्ही विनंती करतो, की भारतीय पोल्ट्री फार्मर्सच्या हितार्थ सध्याचा शंभर टक्के आयातकर कायम ठेवावा.

आपला नम्र
डॉ. सुशांत रॉय बी
अध्यक्ष
कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशन.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *