Menu Home

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 2

कोंबडीने अंडी घातल्यानंतर सामान्य तापमानाला (२८ अधिक वजा २ अंश सेल्सिअस) तापमानाला  १० ते १२ दिवस ताजी  राहू शकतात. मात्र, त्यापेक्षा अधिक तापमानाला त्यांची साठवणक्षमता कमी होत जाते. अंड्याचा ताजेपणा टिकवण्यासाठी साठवणीतील तापमान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, सापेक्ष आर्द्रतेचा काही प्रमाणात परिणाम होतो. अंडी साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर, योग्य कप्पे किंवा अंडी साठवण केसेस यांचा वापर ताजेपणा टिकवण्याचा चांगला मार्ग आहे.  

अंड्याचा ताजेपणा आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी विकत घेतल्यानंतर अंडी ही थंड तापमानामध्ये ( वातानुकुलित साठवण केंद्रे किंवा सुपरमार्केट) ठेवली पाहिजेत. अंड्यासाठी साठवणीसाठी योग्य खेळती हवा, स्वच्छ झाकलेली ठिकाणे आणि उत्तम तापमान असावे.

स्वच्छ, ताजी आणि कोणत्याही प्रकारे खराब किंवा तडे न गेलेली अंडी रेफ्रिजरेटरमध्ये योग्य प्रकारे साठवल्यास थंड तापमानामध्ये ४ ते ५ आठवड्यापर्यंत चांगली राहतात. त्यानंतर अंड्याचा दर्जा घसरत जातो.

ग्राहकांनी अंड्याची हाताळणी अस्ताव्यस्त, अयोग्य पद्धतीने करू नये. त्याच प्रमाणे उष्ण गाड्यांमध्ये किंवा ज्या ठिकाणी तापमान अधिक असते, अशा ठिकाणी अंडी ठेवणे टाळलेच पाहिजे. विकत घेतल्यानंतर घरी पोचल्यानंतर त्वरीत अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत. 

अस्वच्छ किंवा तडे गेलेली अंडी वापरू नयेत. कवचाला तड गेले असल्यास त्यातून जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अस्वच्छ अंड्यामुळे खाद्यपदार्थही प्रदुषित होऊ शकतो. अंडी अनेक वेळा प्रदुषित असली तरी त्या वाईट वास येतोच असे नाही. अस्वच्छ अंडी धुणे टाळावे. कारण ती ओली झाल्यानंतर अधिक सच्छिंद्र होऊन जिवाणूंच्या प्रादुर्भावाला चालना मिळू शकते.

जर अंडे तडा गेलेले किंवा अधिक अस्वच्छ असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

अंड्याच्या हाताळणीपूर्वी हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.

अंड्याच्या दर्जावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्याचा दर्जा. जे शेतकरी अंड्याचे उत्पादन करताना खाद्यामध्ये एरंडी पेंडीचा वापर प्रथिनांचा स्रोत म्हणून करतात, अशी अंडी रबराच्या पोताची बनतात. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्याला संबंधित अन्न प्रशासन विभागाकडून उदा. बीआयएस परवाना घेतलेला असावा. (क्रमश:)

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *